रूथ
11आत्ता असे झाले की शास्ते राज्य करीत असलेल्या दिवसां मध्ये त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी रहायला गेला 2त्या मनुष्याचे नाव अलीमलेख व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते, आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन व खिल्लोन होते. ते एफ्राथी म्हणजे यहूदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते. ते मवाब देशी राहायला गेले.
3त्यानंतर नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन मुलांबरोबर ती मागे राहिली. 4आणि त्यांनी मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले 5आणि महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे बाई आपला पती व दोन मुले यांच्यामागे एकटी राहिली.
6यहोवाने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने मवाब देशी ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत जायला निघाली . 7तेव्हा ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती आणि त्याठिकाणाहून परत यहूदा देशाच्या मार्गाने जायला निघाली.
8नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जसा मृतांबरोबरच्या आणि माझ्याबरोबरच्या कराराला विश्वासू राहील्या तसाच परमेश्वर तुमच्याबरोबर राहो. 9परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विश्रांती मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या. 10परंतू त्या तिला म्हणाल्या, “उलट, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.” 11परंतू नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? 12माझ्या मुलींनो परत जा; मी आता पती करण्यास फार म्हातारी झाले आहे. जर मी म्हणाले मला आशा आहे, आणि आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले, 13तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.”
14मग त्या मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिला बिलगूण राहीली. 15मग ती तिला म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तूही आपल्या जावेच्या मागून जा.”
16परंतू रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव 17तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा आणि माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.” 18तीने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे तिने पाहिले तेव्हा तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले. 19मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. आणि असे घडले बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?”
20परंतू ती त्यांना म्हणाली, “मला नामी म्हणू नका. मला मारा म्हणा, कारण सर्वशक्तिमान देवाने मला फार क्लेशमय वागवले आहे. 21मी भरलेली बाहेर गेले परंतु परमेश्वराने मला रिकामे परत आणले आहे. परंतु परमेश्वराने माझ्याविरूद्ध साक्ष दिली आहे आणि सर्वशक्तिमान देवाने माझे वाईट केले आहे तर तूम्ही मला नामी का म्हणता? ”
22तेव्हा नामी तीची मवाबी सुन रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.
21नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता, आणि तो अलीमलेख वंशाचा मोठा श्रीमंत पुरुष असून. त्याचे नाव बवाज होते
2आणि मवाबी बाई रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.
” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.”
3म्हणून ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता.
4नतंर पाहा, बवाज बेथलेहेमहून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.”
5मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?”
6नतंर कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून परत आलेली ही एक मवाबी स्त्री आहे. 7आणि ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.”
8तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, परंतू येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. 9हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.”
10तेव्हा तीने जमीनीवर पडून दंडवत घालून त्याला म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?”
11मग बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस कि ज्यांची माहिती कालपर्यंत तुला नव्हती झाली याची मला सर्व कल्पना मिळाली आहे. 12परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. आणि ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे प्रतीफळ देवो.”
13मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”
14मग भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
15मग ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका. 16आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.”
17तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत शेतात सरवा झोडिला त्याचे एफाभर 1 साधारण 12 किलोग्राम सातू निघाले. 18ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.
19तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली, त्याचे कल्याण होवो.”
मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, “ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे.”
20तेव्हा नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांबरोबरही आपल्या कराराचे विश्वासूपण सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.”
21मग मवाबी स्त्री रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी पुर्ण करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’ 22नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच तरूण महीला नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”
23या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या तरूण महीला नोकरीणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.
31तेव्हा रूथची सासू नामी तिला म्हणाली, “माझ्या मुली, तुझे चांगले होऊन तुला विसाव्यासाठी एखादे स्थळ मिळावे म्हणून मला शोध करावयास नको काय? 2तर हे पाहा, ज्याच्या तरूण महीला नोकरीणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. 3तर तू शुद्ध हो, सुगंधीत तेल लाव आणि वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत तू त्याच्या नजरेला पडू नकोस. 4तो निश्चीत कोठे झोपतो ते पाहून ठेव आणि तो झोपला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल.”
5आणि ती तिला म्हणाली, “तू ज्या गोष्टी सांगतेस त्या मी करेन.” 6म्हणून ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सांगितले त्यानुसार ती वागली. 7आणि बवाजाचे खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपली. 8मग मध्यरात्र झाल्यावर असे घडले तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले. 9आणि तो म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली महीला दासी रूथ आहे, आणि या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या2 तुम्ही आमचे जवळचे नातलग असल्यामुळे तुम्हाला मला सोडविण्याचा अधिकार आहे, म्हणून माझ्याशी लग्न करा.. कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.”
10मग तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेस अधिक करारातील विश्वासूपण दाखविलेस; कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तरुणाच्या मागे तू गेली नाहीस. 11तर आत्ता मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस माहीत आहे की तू सदगुणी स्त्री आहेस.
12आणि आत्ता मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे. 13तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे, त्यास ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने तो नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाही, तर परमेश्वराच्या जिविताची शपथ, ते मी करीन. सकाळपर्यंत झोपून राहा.”
14मग ती त्याच्या पायाशी झोपून राहिली आणि मग मनुष्य मनुष्यास ओळखेल इतके उजाडेल त्याच्या अगोदर उठली, कारण त्याने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.
15मग तो म्हणाला “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे3 साधारण 24 किलोग्राम सातू मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात गेला.
16मग ती सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले. 17आणि ती म्हणाली “सहा मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, ‘आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको.’ 18आणि ती म्हणाली, “माझ्या मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय शांत राहणार नाही.”
41आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “ येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला 2मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
3मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती आपला बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे, 4आणि आत्ता तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
5मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी स्त्री रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.” 6तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
7आता, पूर्वीच्या इस्राएलात वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून त्याच्या मित्राला देत असे हा कायदेशीर कराराचा प्रकार होता. 8म्हणून तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
9बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. 10आणि महलोनाची विधवा स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून काढून टाकण्यात येऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
11तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो. 12आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
13मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या तिच्या पोटी गर्भ दिला तिला पुत्र झाला. 14तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो. 15तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
16तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या मांडीवरून घेवून ती त्याची दाई झाली. 17“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
18हि पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला, 19हेस्रोनला राम झाला; रामने अम्मीनादाबला जन्म दिला. 20अम्मीनादाब नहशोनचा पिता होता. नहशोनचा मुलगा सल्मोन होता. 21सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला, 22ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.